या सदरा मध्ये विविध शैक्षणि whatsaap group वरिल शैक्षणि माहिती आपणास वाचायला मिळेल
💻💻💻💻💻💻💻💻
📋 ज्ञानरचनावाद 📋
एक शास्त्र - एक शस्त्र
______________________________
__🇵 🇷 🇲 🇦 🇸 🇰 🇮__
काही NGO दरवर्षी आपापल्या अहवालातून जिल्हा परिषद शाळांच्या घसरलेल्या गुणवत्तेवर टिका करताना दिसते. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ते संदर्भात त्यांनी मांडलेले निष्कर्ष संपूर्णतः सत्य नसले तरी काही प्रमाणात तरी खरे असतात हे नाकारता येणार नाही.
गुणवत्तेसंदर्भातील हे चित्र पालटायचे असेल तर जिल्हा परिषद शाळांना फार मोठ्या स्थित्यंतरातून जावे लागेल.
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्याकरीताच माननीय नंदकुमार साहेबांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून साहेबांनी महाराष्ट्रातला एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये हे स्वप्न पाहीले. यासाठी साहेब सतत शिक्षकांना व्हाट्सप च्या माध्यमातून प्रेरणा देत असतात. त्यांच्या या प्रेरणेमुळे शिक्षकांमध्ये कधी नव्हे एवढे नवचैतन्य संचारले आहे.
त्यामुळे आमच्या शिक्षकांनी १००% विद्यार्थ्यांना प्रगत करण्याची मनाशी खुणगाठ बांधलेली आहे आणि यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी केली आहे. यातलाच एक भाग म्हणजे "कुमठे बिट अभ्यासदौरा".
" कुमठे बिट अभ्यासदौर्यामधून १००% विद्यार्थी प्रगत करणे अशक्य नाही हे उमजले आणि त्यासाठी काय करता येईल हेही समजले".
कुमठे बिटने "ज्ञानरचनावाद" हे नवीन शस्त्र आपल्या हाती दिलं आहे. हे शस्त्र वापरून अप्रगत विरूद्धची लढाई सहजपणे जिंकता येईल.
'ज्ञानरचनावाद' ही संकल्पना आपल्या साठी नवीन नसून हिचा समावेश २००५ च्या राष्ट्रीय शैक्षणिक आराखडय़ात करण्यात आला होता परंतु त्यावेळी ही संकल्पनाच स्पष्ट न झाल्यामुळे ती सतत दुर्लक्षित राहीली.
आपल्याला पारंपारिक पध्दतीने शिकवण्याची सवय जडली आहे आणि कोणतीही सवय मोडणे कठीण असते. असं म्हणतात की "माणूस सवयींचा गुलाम असतो" परंतु ही म्हण आपल्याला खोटी ठरवून पारंपारिक पद्धती सोडून,'ज्ञानरचनावादी पद्धती ' पूर्णपणे स्विकारावीच लागेल. त्याशिवाय प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार नाही.
📋 ज्ञानरचनावादच का? 📋
__________________
''ज्ञानरचनावाद म्हणजे पुर्वज्ञानाची सांगड घालून नवीन ज्ञान मिळवणे".
यामध्ये विद्यार्थी कृती करतो, विचार करतो व मिळालेल्या अनुभवातून शिकतो. म्हणजेच स्वतः शिकतो. स्वतः शिकल्यामुळे त्याला अध्ययनाची गोडी लागते.
सायकल चालवायला शिकणे, पोहायला शिकणे ही ज्ञानरचनावादाचीच उदाहरणे आहेत.
"पारंपारिक पद्धतीमध्ये शिक्षक शिकवतो व विद्यार्थी शिकवलेलेच शिकतो". म्हणजेच शिक्षक शिकवतील तेव्हाच मुलं शिकतील आणि हे जबरदस्तीचे शिक्षण मुलांना कंटाळवाणे वाटते त्यामुळे त्यांची शिकण्याची गती कमी होते.
असं म्हणतात की "मुलं कोणाच्या मर्जीने नव्हे तर मेंदूच्या मर्जीने शिकतात"
मेंदूच्या मर्जीने शिकण्याची भरपूर संधी ज्ञानरचनावादामध्ये मिळते. या पद्धतीने मुलांची अभ्यासाची आवड व शिकण्याची गती दोन्ही वाढते. म्हणजे आपल्याला हवा असलेला परिणाम लवकर मिळतो.
उदा. ➖
पारंपरिक पद्धतीमध्ये सम संख्या शिकवताना शिक्षक सुरुवातीलाच ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ हे अंक असतात त्या संख्येला सम संख्या म्हणतात असे सांगतात.
ज्ञानरचनावादी पद्धतीमध्ये मात्र ज्या संख्येच्या शेवटी ०,२,४,६,८ हे अंक असतात त्यांना सम संख्या म्हणतात, "हा निष्कर्ष विद्यार्थी स्वतः कृती करून, खेळाच्या माध्यमातून किंवा साहीत्य हाताळून स्वतः काढतात".
म्हणजे "पारंपारिक पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या कृतीला, कल्पकतेला वाव नसतो तर ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थी कृती व कल्पकतेतूनच शिकतो"
सोबतच ज्ञानरचनावादामध्ये गटपद्धती वापरल्या गेल्या मुळे मुलांना समुहात काम करण्याची व एकमेकांच्या सहकार्यातून शिकण्याची संधी मिळते.
तेव्हा सर्वांनी पारंपरिक अध्यापन पद्धतीचा त्याग करुन ज्ञानरचनावादी पद्धती आत्मसात केली तर १००% प्रगत विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणा.
No comments:
Post a Comment